शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
सामाजिक बातमी
क्रांती युवक मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली स्थानिक कार्यकर्त्यांचे ढोल पथक
सर्वांची पारंपारिक वेष भुषा व डोक्यावर फेटा तसेच गणरायांना सजवलेल्या पालखीत विराजमान करून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक खास ठरली.
मिरवणुकीच्या सुरवातीला शिर्डी शहरातील विशेष नैपुण्य असलेल्या स्मशान भूमीत सेवा देणारे विष्णू गायकवाड, स्वाभिमानी दिव्यांग पवन शेट्टी, विशेष स्वच्छता कर्मचारी आदर्श चहा विक्रेता रोहित गायकवाड, दही हंडीत सर्वात उंच थरावर जाणारे धाडसी बालक, हस्तलिखीत साई सतचरित्र लिहिणाऱ्या पुष्पाताई काळे यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, शिर्डी एअरपोर्टचे सीआयएसएफ चे आमिषकुमार, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे, शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, वाहतूक अधिकारी येसेकर साहेब,
साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व प्रसिद्ध डॉ. वसंत गुंड आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांती युवक मंडळाचे सुरेंद्र महाले यांनी प्रास्ताविक केले.
व क्रांती युवक मंडळाच्या ढोल पथकाची माहिती संदेश रत्नपारखी व ललित शेळके यांनी दिली. व क्रांती ट्रेकर्स या धाडसी उपक्रमाची माहिती आदित्य वारुळे यांनी दिली.
याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले व समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रकाशझोतात आणून त्यांचा सत्कार केल्याने आनंद वाटला तसेच क्रांती युवक मंडळाच्या गिर्यारोहनाच्या उपक्रमाचे देखील विशेष कौतुक केले.
तसेच शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब यांनी क्रांती युवक मंडळ हे देव देश आणि धर्मासाठी कार्य करते व इतक्या मोठ्या प्रमाणात स्थानिक युवती ढोल पथकात सहभागी झाल्या यावरूनच मंडळावर मोठा विश्वास असल्याचे लक्षात येते असे सांगितले.
शिर्डी एयरपोर्ट सीआयएसएफ चे डेप्यूटी कमांडेंट आमिषकुमार जी यांनी देशभक्तीची व अध्यात्माची सुरवात महाराष्ट्रातून होते हे आवर्जून सांगून मंडळाला शुभेच्छा दिल्या.
उपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते गणरायांची सामूहिक आरती झाली व वाद्य पूजन होवून ढोल पथकाच्या निनादासह गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणासह विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी
बबलू वर्पे,आकाश वाडेकर ,अतिक पठाण महेश वैद्य, दत्तू झाकणे,किरण परदेशी, आदित्य वारुळे हृषब अग्रवाल, अरुण हजारे, विनोद प्रेमानी योगेश मोटवानी, आदित्य वारुळे,आर्यन तेजी,पारितोष पटेल,मयूर बोराडे, साई थोरे, रितेश भालेराव, लखन जवेरी, अनंत लासूरे,हितेश अष्टेकर, प्रतीक वाघचौरे, यांच्या सह अनेक
कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
[क्रांती युवक मंडळ पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांचे ढोल ताशा पथकासह विसर्जन मिरवणूक काढते.
शिस्त व नेमके नियोजन यामुळे महिला भगिनीची विशेष उपस्थिती असते.
या वर्षी समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मान दिला.
आपले धार्मिक संस्कृती टिकवणे हा उद्देश असल्याने मोठा प्रतिसाद मिळतो
सचिन तांबे
मा. विश्वस्त साईबाबा संस्थान ]

