shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न

*इंदापूर भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न*
इंदापूर :देशाचे पंतप्रधान   नरेंद्र मोदी  यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याचे योजिले आहे. या अनुषंगाने शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

इंदापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते  प्रविण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

विकास पुरुष मोदी यांच्या 75 री निमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने जे कार्यक्रम घेण्याचे आयोजित केले आहे ते तब्बल पंधरा दिवस साजरे करण्यात येणार असून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील गावातून मोदीजींना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचे इंदापूर भाजपाच्या वतीने ठरविण्यात आल्याचे प्रतिपादन यावेळी  प्रविण माने यांनी केले.

रक्तदान शिबिर , सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे,  मोदीजींच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शन भरवणे, आरोग्य शिबिराचे , विचारवंत संवाद परिषद,  मोदीजींच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचे वितरण करणे, राज्यातील विशेष व्यक्तींचा सन्मान करणे, मोदी विकास मॅरेथॉनचे आयोजन या आणि अशा असंख्य कार्यक्रमाची या पंधरवड्यात रेलचेल असल्याची माहिती माने यांनी आमच्याशी बोलताना दिली.

निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या निमित्ताने प्रविण माने या समवेत मयुर पाटील, आकाश कांबळे,गोविंद देवकाते, धनंजय कामठे, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रविणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे,राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाताताई  कुलकर्णी, प्रमिलाताई राखुंडे, माधुरीताई भराटे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close