shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रद्धेय कर्मयोगी शंकराव पाटील ( भाऊ ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन*

*श्रद्धेय कर्मयोगी शंकराव पाटील ( भाऊ ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन*
      इंदापूर : माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकरावजी बाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. 
      यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार ,मान्यवर संस्थेचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 
        समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले. 
      कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे  देशपातळी बरोबरच महाराष्ट्र तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी, सहकार तसेच शिक्षण, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे. कर्मयोगी परिवार दरवर्षी भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्रित येऊन त्यांना अभिवादन करतात.
     यावेळी संस्थेचे संचालक ॲड. मनोहर चौधरी, विलासराव वाघमोडे, तुकाराम जाधव, माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, माजी नगरसेवक शेखर पाटील, माजी नगरसेवक कैलास कदम ,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मनोज मोरे ,ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश देवकर, मेघ:शाम पाटील,  मच्छिंद्र शेटे , अविनाश कोथमीरे तसेच सागर गानबोटे, दादा पिसे, नितीन मखरे , ललेंद्र शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे उपस्थित होते.
close