धरणगाव प्रतिनिधी --
धरणगाव -- तालुक्यातील जांभोरे येथील राहिवासी परेश सुभाष गुजर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धरणगाव युवक तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की उद्योजक एकनाथ पाटील यांच्या सर्वज्ञ इन्फ्रास्टक्चर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीत धरणगाव युवक तालुकाध्यक्षपदी परेश गुजर (जांभोरे), युवक कार्याध्यक्षपदी साईनाथ पाटील (बाभुळगाव), युवक तालुका उपाध्यक्षपदी राहुल पाटील (बाभुळगाव), योगेश पाटील (सार्वे), प्रमोद पाटील (पिंपळे बु) तसेच जळगाव युवक तालुकाध्यक्षपदी महेश बोरसे (शिरसोली) या सर्व पदाधिकाऱ्यांची युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, महिला तालुकाध्यक्ष आशा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा एन डी पाटील, डॉ विलास चव्हाण, जेष्ठ पदाधिकारी नंदू धनगर, राजेंद्र धनगर, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाची संघटनात्मक बांधणी करतांना साहेबांचा पुरोगामी विचार जनमानसात रुजवला गेला पाहिजे तसेच बूथ कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे असे मत मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. या बैठकीला जेष्ठ नेते विनायक पाटील, रमेश सपकाळे, भगवान शिंदे, अमित शिंदे, गोपाल पाटील, युवा कार्यकर्ते जुनेद बागवान, साजिद कुरेशी, प्रकाश लांबोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार यांनी केलं.


