प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील राहुल प्रतिष्ठान चे संघटक व होतकरू तरुण अतूल अभिमन्यू ठोंबरे यांची ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सर्वांशी मनमिळावू हळवा स्वभावाच्या व शिक्षक कॉलनी भागातील प्रत्येक सामाजिक कार्यात तसेच उत्सवात अग्रभागी राहणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात हरिणी सहभागी होणारे राहुल प्रतिष्ठान चे संघटक अतुल अभिमन्यू ठोंबरे यांची ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज यांच्यातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी पञकार प्रकाश मुंडे, सरपंच चंदू चौरे, सोनू धस , अमोल धस, अमोल मुंडे ,गोटू भैय्या पाळवदे , लक्ष्मणराव वाघमारे,चौरे मामा, विकास मुळे , घूले पैलवान, राजेश राऊत, अमोल ठोंबरे, प्रदीप ठोंबरे, प्रशांत धस, आशिष केदार,विक्की घोडके, पारस थोरात, बारगजे ब्रदर व राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अतूल अभिमन्यू ठोंबरे यांचे शिक्षण बीएससी पदवी प्राप्त झाले आहे. तसेच या कामासाठी त्यांचे बंधू अमोल ठोंबरे यांनी व त्यांच्या मातोश्री यांनी खुप मोठी मेहनत घेतली आहे. अतुल ठोंबरे यांची ग्राम विकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

