एरंडोल – रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य व खजिनदार तसेच निवृत्त तहसिलदार अरुण माळी यांची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते धुळे, जळगाव व नंदुरबार या प्रादेशिक विभागात कार्य पाहणार आहेत. संघटनेच्या एकूण ४७० सदस्यांचा विश्वास मिळाल्याने माळी यांना अध्यक्षपदी सेवा करण्याची संधी मिळाली आहे.