shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल : ग्रामीण रुग्णालयातर्फे रा. ती. काबरे विद्यालयात आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन.

एरंडोल : ग्रामीण रुग्णालयातर्फे रा. ती. काबरे विद्यालयात आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोज

प्रतिनिधी, एरंडोल –
ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या वतीने शहरातील रा. ती. काबरे विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गुप्तरोग, क्षयरोग (टीबी), एचआयव्ही-एड्स तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते. प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. राठी, समुपदेशक अंकुश थोरात, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस. एस. भांडारकर, पी. आर. जोशी, राष्ट्र विकास संस्थेचे प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी आदी मान्यवरांचा समावेश होता.

शिबिरात डॉ. दीपक जाधव आणि समुपदेशक अंकुश थोरात यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन अवस्थेत होणारे शारीरिक बदल, मानसिक ताणतणाव, सामाजिक जबाबदाऱ्या, लैंगिक आरोग्य शिक्षण आणि एचआयव्ही-एड्स यांसारख्या गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवून समाजाच्या आरोग्य संवर्धनात प्रत्येकाने सक्रिय भूमिका घ्यावी, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

मुख्याध्यापक एस. एस. राठी यांनी शालेय जीवनात आरोग्यदायी सवयी आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालय एरंडोलचे आरोग्य कर्मचारी तसेच काबरे विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस. एस. भांडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

close