आशिया चषक २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात गुरुवारी बांगलादेश संघाचा सामना हाँगकाँगशी झाला. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव करून ११ वर्षांचा बदला घेतला. आतापर्यंत बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात फक्त एकच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. सन २०१४ मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हाँगकाँगने २ गड्यांनी विजय मिळविला होता. विद्यमान आशिया चषकात हाँगकाँगचा सलग दुसरा पराभव आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने २० षटकांत ७ गडी गमावून १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १७.४ षटकांत ३ बाद १४४ धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने अर्धशतक झळकावले. त्याने ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. दासला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
कर्णधार लिटन दासच्या जबाबदार कप्तानी खेळीच्या जोरावर बांगलादेशने गुरुवारी हाँगकाँगविरुद्ध सात विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात लिटन दासने तौहीद हृदयॉयसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. अबूधाबी येथील झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया चषक ङ् २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगच्या संघाने २० षटकांत सात विकेट्सवर १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशच्या संघाने १७.४ षटकांत तीन विकेट्सवर १४४ धावा केल्या आणि सामना जिंकला.
या सामन्यात, बांगलादेशचा कर्णधार लिटन दास आणि तौहीद हृदयॉय यांनी शानदार कामगिरी केली. दोघांमध्ये ९५ धावांची भागीदारी झाली, जी टी२० आशिया कपमध्ये तिसऱ्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येसाठी चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक भागीदारी आहे. याआधी, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांची भागीदारी केली होती. या बाबतीत अव्वल स्थानावर पाकिस्तानचे शोएब मलिक आणि उमर अकमल आहेत, ज्यांनी २०१६ मध्ये यूएईविरुद्ध ११४* धावांची सर्वात मोठी भागीदारी केली होती. दुसऱ्या स्थानावर किंग कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी आहे, ज्यांनी २०२२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध ९८ धावांची नाबाद भागीदारी केली होती.
या सामन्यात लिटन दास ३९ चेंडूत ५९ धावा काढून बाद झाला. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. त्याच वेळी, तौहीद ३६ चेंडूत ३५ धावा काढून नाबाद राहिला. लिटनचे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे चौथे अर्धशतक आहे. यासह, त्याने मोठी कामगिरी केली. बांगलादेशसाठी टी२० आशिया कपमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ८० धावांची शानदार खेळी खेळणाऱ्या सब्बीर रहमानच्या नावावर होता.
अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगने २० षटकांत ७ गडी बाद १४३ धावा केल्या. परवेझ हुसेन इमोन १९ धावा करून बाद झाला आणि तन्जीद हसन १४ धावा करून बाद झाला. अतिक इक्बालने २ बळी घेतले आणि आयुष शुक्ला एक बळी घेतला.
हाँगकाँगचा निजाकत खान ४२ धावा, झिशान अली ३० धावा तर कर्णधार यासिम मुर्तझा २८ धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून टस्किन अहमद, तन्झीम हसन सकीब आणि रिशाद हुसेन यांनी २-२ बळी घेतले. रिशादने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० बळी पूर्ण केले.
आतापर्यंत लिटन दासने बांगलादेशसाठी सर्वाधिक ७८ षटकार मारण्याचा नवा विक्रम रचला. त्याने महमुदुल्लाह (७७ षटकार) ला मागे टाकले. बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यात सर्वात मोठा एकूण धावसंख्या झाली आहे. अबू धाबीमध्ये २८७ धावा झाल्या. मागील रेकॉर्ड २२२ धावांचा होता.
आशिया कपमध्ये विजयाने सुरुवात केल्याबद्दल बांगलादेशच्या कर्णधाराने आनंद व्यक्त केला. लिटन दास म्हणाले, 'पहिला सामना जिंकणे महत्त्वाचे होते. आम्ही गेल्या दोन मालिकांमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहोत, परंतु आशिया कपमध्ये दबाव वेगळा असतो. आज आम्ही खूप चांगले खेळलो. आमच्या वेगवान गोलंदाजी विभागाने गेल्या काही वर्षांत खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला फक्त लेग स्पिनरची आवश्यकता होती आणि रिषदने खूप चांगली कामगिरी केली. खेळपट्टी थोडी संथ होती, म्हणून आम्हाला मधल्या षटकांमध्ये सावधगिरीने खेळावे लागले आणि एकेरी आणि दुहेरी धावा करून मोठ्या मैदानाचा पूर्ण फायदा घ्यावा लागला.
बांगलादेश आयसीसीचा पूर्ण सदस्य देश तर हाँगकाँग सहसदस्य देश आहे. मात्र या दोन संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर या सामन्यासह दोनच सामने झाले असून त्यांचे समिकरण बरोबरीत आहे. या स्पर्धेचा विचार केला तर हाँगकाँगला फारसे चांगले भविष्य नाही. परंतु बांगलादेशचा हा विजय त्यांच्या पुढच्या फेरीसाठी लाभदायक ठरू शकतो.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.