shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार...

जळगांव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे कार्यरत असलेले अध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील सक्रिय सहभागाबद्दल आज दि. ९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांवचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.


याप्रसंगी, प्रशासकीय कामकाजातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांतील अनेक अध्यापकांनी, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सन्मानपत्र स्वीकारले. या सन्मानपत्राद्वारे आरोग्य योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून, ते भविष्यातही अशाच प्रकारे शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहतील अशी अपेक्षा आहे.

*सन्मानित झालेल्या अध्यापकांच्या, अधिकारी,कर्मचारी यांची नावे*

डॉ. गिरीश ठाकुर, अधिष्ठाता

डॉ. मारोती पोटे, उपअधिष्ठाता (पदव्युत्तर) तथा विभाग प्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र विभाग

डॉ. धर्मेंद्र पाटील, वैद्यकीय अधिक्षक 

डॉ. जितेंद्र सुरवाडे, प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय)

संजय चौधरी, प्रशासकीय अधिकारी (रुग्णालय)

दिलीप मोराणकर, उच्च श्रेणी लघुलेखक

निलेश बारी, निम्नश्रेणी लघुलेखक

डॉ. दिपक शेजवळ, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, विकृतीशास्त्र विभाग

डॉ. हितेश अडचित्रे, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग

डॉ. राजश्री चौरपगार, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान, नाक व घसा विभाग

डॉ. ललित राणे, सहाय्यक प्राध्यापक, कान, नाक व घसा विभाग

डॉ. बाळासाहेब सुरोशे, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग

डॉ. गिरीश राणे, सहाय्यक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग

डॉ. इंद्राणी मिश्रा प्रसाद, सहाय्यक प्राध्यापक, बालरोगशास्त्र विभाग  

डॉ. पाराजी बाचेवार, प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग

डॉ. राजकुमार सूर्यवंशी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग

डॉ. विश्वनाथ पुजारी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, क्षयरोगशास्त्र विभाग

डॉ. स्वप्निल चौधरी, सहाय्यक प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र विभाग

डॉ. अमित भंगाळे, सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग

डॉ. नेहा चौधरी, सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग

डॉ. योगिता बावस्कर, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, जन औषधवैद्यकशास्त्र

डॉ. विलास मालकर, सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यकशास्त्र

डॉ. मोनिका युनाती, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीरक्रियाशास्त्र

डॉ. अमित हिवरकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, बधिरीकरणशास्त्र विभाग

डॉ. राजेश जांभुळकर, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, जीवरसायनशास्त्र विभाग

डॉ. संगीता गावीत, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र विभाग

डॉ. रोहन पाटील, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र विभाग

डॉ. राहुल कातखडे, सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभाग

डॉ. सुमित जैन, जिल्हा समन्वयक, जळगाव

श्रीमती संगीता शिंदे, अधिसेविका

कृष्णा भागवत, वरिष्ठ लिपीक (आस्थापना)

राजा कोळेकर, वरिष्ठ लिपीक (रोखपाल)

अभिषेक मोहन पाटील, डाटा एन्टी ऑपरेटर

संदीप कैलास माळी, डाटा एन्टी ऑपरेटर



close