shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंत्री गिरीशजी महाजनांचा ठाम पवित्रा; हल्ला झालेल्या धोत्रे कुटुंबाच्या दुःखात धावून जाऊन मदतीची हमी!

नाशिक | विशेष प्रतिनिधी

शनिवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकमधील नांदूर नाका परिसरातील वडार समाजातील धोत्रे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात कै. राहुल धोत्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर राज्यातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वतः पुढाकार घेत धोत्रे कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्या दुःखात मनापासून सहभागी होत आश्वासन दिले की धोत्रे कुटुंबाच्या मागे सरकार व मी  आहे त्यामुळे धोत्रे कुटुंबाने काळजी करण्याचे काहिच कारण नाही.




महाजन साहेबांनी पीडित कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याची विचारपूस करून त्यांना ठाम दिलासा दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

गुन्हेगार कितीही ताकदवान असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. कोणत्याही आरोपीस राजकीय छत्रछाया मिळणार नाही. पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देणे हीच खरी राजकारणातील सेवा आहे.”

या प्रसंगी मा. आमदार सौ. देवयानीताई फरांदे, भाजप शहराध्यक्ष सुनिलभाऊ केदार, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, तसेच नेते राजू जाधव, रवि शिंदे, व संतोष धोत्रे यांनी महाजन साहेबांसोबत उपस्थित राहून पीडितांना धीर दिला. स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन या कुटुंबासाठी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

महाजन साहेबांनी या प्रसंगी पीडितांना आर्थिक तसेच कायदेशीर मदतीचे ठोस आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाला गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, “या कुटुंबाच्या न्यायासाठी मी स्वतः जबाबदारी घेणार,” असे ठाम शब्दांत सांगितले.

धोत्रे कुटुंबाशी संवाद साधताना महाजन साहेबांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि ठाम नेतृत्व पाहून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे. समाजातील उपेक्षित घटकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध महाजन साहेबांनी उचललेले हे धाडसी पाऊल हा एक आदर्शवत संदेश आहे.

०००००

close