प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
मौजे कोल्हेवाडी तालुका केज जि. बीड येथील शासकीय अंगणवाडी सह दोन गुंठे जागा हाडपण्याचा प्रयत्न कोल्हेवाडी येथील संजय शंकर डांगे व त्यांचा मुलगा वैभव संजय डांगे यांनी केला आहे.
अंगणवाडीला कुलूप ठोकीन , व शासकीय बांधकाम काढून टाकीन आशा धमक्या गावच्या सरपंच यांना दिल्या
तसेच शासकीय कामात सूडबुद्धीने अडथळा आणून गावामध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच शासकीय जागा हडपण्याचा संदर्भात कोल्हेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने आज दिनांक09/09/25 रोजी गटविकास अधिकारी केज, तहसीलदार केज, तसेच पोलीस निरीक्षक साहेब केज यांना निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पुढील कारवाई करावी, यासंबंधीचे निवेदन ग्रामपंचायत कोल्हेवाडी व ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.
तरी सदर प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.



