.तालुकास्तरीय खो खो स्पर्धेने पळसदेव गाजले!
बनसुडे विद्यालयात 70 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)-गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पळसदेव विद्यालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महेश चावले (विभागीय क्रीडाधिकारी), शरद झोळ (तालुका क्रीडा अधिकारी अध्यक्ष) उमेश राऊत, दत्तात्रेय व्यवहारे, सरपंच कोमल बनसुडे, उपसरपंच जयश्री शेलार, माजी सरपंच इंद्रायणी सुजित मोरे ,माजी उपसरपंच कैलास भोसले, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे,विश्वस्त उमा बनसुडे, अंकुश बनसुडे प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे सर्व विभागाचे विभाग प्रमुख,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. स्पर्धेत तालुक्यातील 70 शाळांनी सहभाग नोंदवला होता. 14 व 17 वयोगटातील मुला मुलींनी खो-खो स्पर्धेमध्ये सहभाग घेतला प्रत्येक वयोगटात अतिशय रंजक व चुरशीच्या लढाई पाहायला मिळाल्या. यामध्ये 14 वर्ष मुली प्रथम क्रमांक श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु.
द्वितीय क्रमांक जि.प .प्रा शाळा वायसेवाडी
व तृतीय क्रमांक केतकेकश्वर विद्यालय निमगावकेतकी व 17 मुली प्रथम क्रमांक उदामाई विद्यालय घोलपवाडी ,द्वितीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु. ,तृतीय क्रमांक नागेश्वर विद्यालय शेटफळगडे
या शाळांनी पटकावला तसेच या कार्यक्रमांमध्ये DTSE, मंथन अबॅकस व दहावी बारावीतील शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी होते विद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक सतीश बनसुडे, कैलास जाधव व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व संपूर्ण टीमने केलेल्या परिश्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.पुणे जिल्हा खो खो असोसिएशन, संदीप बल्लाळ
प्रसिद्धी समिती सदस्य महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.

