shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भर पावसात संतापाचा ज्वालामुखी; आदिवासी महिलांचा अवैध दारुविक्रीविरोधात रस्तारोको रणसंग्राम!


🖋️ अकोले प्रतिनिधी

भर पावसातही संतापाचा ज्वालामुखी उफाळून आला आणि आदिवासी भागातील महिला रस्त्यावर उतरल्या!
रविवारी वारंघुशी फाट्यावर (ता. अकोले) अवैध दारु विक्रीविरोधात महिलांसह पुरुषांनी तब्बल दोन तास रस्तारोको आंदोलन छेडत प्रशासनाला जागे केले. यामुळे अकोले-पिंपळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.



📢 “आता पुरे झालं!”
अवैध दारु विक्रीविरोधात अनेकदा निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण प्रशासन गप्प असल्याने संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सरपंच आणि उपसरपंचांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महिला, कार्यकर्ते, तरुण, ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.

🚨 लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने तातडीने धाव घेत लेखी स्वरूपात अवैध दारु विक्री थांबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.

🌧️ पावसाच्या सरींमध्येही महिलांचा लढा प्रशासनाच्या ढिलाईला चपराक देणारा ठरला!

०००००

close