shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कैलास लोहार यांची शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

   न्याहाळोद_न्याहाळोद येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.कैलास भावलाल लोहार यांची पंचायत समिती अक्कलकुवा येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदी नुकतीच निवड झाली म्हणून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   या जगात कैलास लोहार सारखी काही माणसे जन्माला येतात ते विजयाच्या व कर्तुत्वाच्या झेंडा हाती घेऊनच.जीवनाचं सोनं करण्यासाठी,स्वतःचा जन्माच सार्थक करण्यासाठी,आपल्या उद्धारासाठी आणि पर्यायाने जनतेच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म होत असतो आणि ते विजयाची साक्ष देणारे स्तंभ होतात.जनतेचे आधारस्तंभ होतात.जन्म येणे देवा हाती पण जन्माचे सोनं करणे ही मान्य कृती असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते कैलास लोहार सरां बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.त्यांनी भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती,कुटुंब कल्याण,आई वडिलांचा सांभाळ,भ्रूणहत्या, अंधश्रद्धा,बेटी बचाव बेटी पढाव, वासुदेव,गोंधळीचे पात्र करून समाप्त प्रबोधन केले आहे.

   शिक्षणाची आवड असणारे, मेहनती,जिद्दी,संघर्ष योद्धा,आज गावाची शान,परिवाराच्या मान मोठा करणारे गुरुजी ते साहेब हा सन्मान मोठा ऐतिहासिक वाटतो. त्यांच्याकडे प्रचंड लोक संग्रह असून एक प्रेमळ,निर्मळ,उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची खास ओळख आहे. आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
close