shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाद्रपद पौर्णिमा उत्सवानिमित्त अडबंगनाथ भजन संध्या व किर्तन सोहळा


भामानगर (ता. श्रीरामपूर):
सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आणि गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या स्नेहळ मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर येथे भाद्रपद पौर्णिमा उत्सव रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.


सकाळी ७ वाजता अडबंगनाथांची प्रार्थना, आरती आणि होम-हवनाने कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी १० वाजता विदर्भरत्न श्री निळकंठराव तरकासे बाबूजी यांच्या उपस्थितीत अडबंगनाथ भजन संध्या पार पडणार असून राहुल महाराज चेचरे, विशाल महाराज रोकडे आणि बाबा महाराज मगर यांची साथ-संगत लाभणार आहे.

यानंतर सकाळी ११ वाजता ह.भ.प. विनोदाचार्य बाबा महाराज मगर यांचे सुश्राव्य किर्तन होईल. तसेच गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभतील. कार्यक्रमानंतर श्री. सुभाष मुरलीधर शिंदे (नांदी, वैजापूर) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाद्रपद पौर्णिमेला भगवंताचे नामस्मरण केल्यास पापांचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होते, म्हणून या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

📍 स्थानिक माहिती:
श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी मंदिर हे श्रीरामपूर-नेवासा हायवेवरील भोकर गावाजवळ असून फक्त ५ किमी अंतरावर आहे. शिर्डी, शिंगणापूर येथून ३५-४० किमी तर देवगड येथून फक्त ३८ किमी अंतरावर आहे.

📢 सोशल मीडिया व संपर्क:
सोहळ्याचे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी ‘अडबंगनाथ दर्शन’ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि SWAMI_ARUNNATHGIRI_MAHARAJ या इन्स्टाग्राम आयडीला फॉलो करा.
संस्थान संपर्क: 7588605305 / 7020902470.

📞 अन्नदान व सहकार्य:
अडबंगनाथ तपोभूमीमध्ये गुरुवार, पौर्णिमा, एकादशी निमित्त अन्नदान केले जाते. गुरुकुल विकासकामासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्यासाठी फोनपे/गूगलपे नं. 9921773005.

✨ सर्व भाविकांना भाद्रपद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ..!

close