shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विघ्नहर्त्या श्रीगणरायाने दुष्काळाचे विघ्न दूर करावे- हर्षवर्धन पाटील -इंदापूर निवासस्थानी श्रीगणरायाचे आगमन

विघ्नहर्त्या श्रीगणरायाने दुष्काळाचे विघ्न दूर करावे- हर्षवर्धन पाटील 
-इंदापूर निवासस्थानी श्रीगणरायाचे आगमन 
इंदापूर : प्रतिनिधी दि.14/9/26
                                          सध्या राज्यामध्ये पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, शेतकरी, नागरिकांमध्ये तसेच समाजातील सर्वच घटकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी आता उर्वरित पावसाळ्यामध्ये धो धो असा परतीचा पाऊस येऊन, विघ्नहर्त्या श्री गणरायाने दुष्काळाचे विघ्न दूर करावे, असे साकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री गणराया चरणी सोमवारी (दि. 14) घातले.
    इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणामध्ये सोमवारी सकाळी करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन पाटील, निरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते धार्मिक वातावरणामध्ये विधिवत पूजा व आरती करण्यात आली. या विधीचे पौराहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले.
    आज महाराष्ट्रामध्ये घराघरात गणरायांचे उस्फूर्तपणे स्वागत केले जात आहे, तसेच हा उत्सव देश-विदेशातही आनंदाने साजरा केला जात आहे. श्री गणरायाचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाची आपणा सर्वांसाठी पर्वणीच आहे. श्री गणरायाच्या कृपेने प्रत्येकाचे आयुष्य हे प्रगतीचे, भरभराटीचे व समाधानकारक जावो, येत्या काळात श्री गणेश कृपेने दमदार पाऊस होऊन आगामी वर्षे शेतकरी व नागरिकांसाठी सुख-समृद्धीचे व आनंदाचे जावो, अशीच प्रार्थना श्री गणराया चरणी केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील, सौ. भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्ताने जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या. 
    _______________________
फोटो:-इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानी श्री गणरायाच्या प्रतिष्ठापना प्रसंगी हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व राजवर्धन पाटील.
close