शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार ता.१०/०९/२०२५
राहुरी (खडांबे) : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या नियतकालीन बदली प्रक्रियेमध्ये राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाग वांबोरी स्टेशन येथील मुख्याध्यापक नरवडे, शिक्षक भुजबळ,कारंडे, तसेच शिक्षिका सौ.कचरे या शिक्षकांनी गेल्या सात वर्षापासून वांबोरी स्टेशन या शाळेत सेवा दिली होती परंतु नियतकालीन बदली प्रक्रियेमध्ये त्यांची नुकतीच बदली झाली.
एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांच्या कार्यकाळात शाळेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढली त्याचप्रमाणे शालेय परिसरात भौतिक सुधारणाही चांगली झाल्याने या शिक्षकांप्रती आदराची आणि आपुलकीची भावना निर्माण झाली या सर्व शिक्षकांना जड अंतकरणाने निरोप देताना पालकांसहित इतर शिक्षकांचेही डोळे पाणावले होते विद्यार्थी देखील भावनिक झाले होते.
या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी खडांबे खुर्द येथील माजी उपसरपंच राजेंद्र कल्हापुरे होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कल्हापुरे, उपाध्यक्ष प्रसाद शेळके, माजी अध्यक्ष श्री गोरक्षनाथ कल्हापुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी-माजी सदस्य व पंचक्रोशीतील सर्व पालक,माता-भगिनी,शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600