शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार ता.१०/०९/२०२५
....खरोखर गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी असे म्हणायची वेळ आलीय खंडांबे खुर्द येथील ग्रामस्थ आणि पालकांना.....!!
मनाच्या तळाशी खोलवर साठवून ठेवल्या जातात त्या नाजूक आठवणी.... मग असेच शांत, एकांतात, स्वतःशी बोलताना,. निःशब्द करुन जातात त्या आठवणी...!!!!!
.....
राहुरी (खंडांबे खुर्द) : खरोखर गुरू (गुरूजी) .....सर/ मॅडम आपण आमच्या खंडांबे गावातील छोट्याशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपण ज्या दिवसापासून रुजू झालात आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपण केलेल बहुमूल्य कार्य हे खरोखर वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद आहे आपण सर्व शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात विद्यार्थ्यांना असे काही घडवत आलात की आत्तापर्यंत शाळेच्या इतिहासात खरोखर नोंद व्हावी असे बहुमूल्य कार्य आपण सर्वांनीच केल आणि आमच्या खडांबे खुर्द गावातील अनेक बाळ-गोपाळाना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न आपण केला, शाळेतील नवं गतांचा प्रवेश असो की बाळ आनंद मेळावा असो, चिमुकल्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असो,नव-नवीन उपक्रम राबवून विद्यार्थी अधिकाधिक तेजस्वी आणि सु संस्कारक्षम पिढी घडविली निव्वळ प्रयत्नच नाही केले तर ते त्यांच्या कृतीतून सिद्ध करून घेतलं
तसेच पालकांचे अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव वेळोवेळी करून देत त्यांना देखील एक सुजान पालक म्हणून आपणच घडविले त्याबद्दल आपल्या सर्व शिक्षकांचे मनापासून मनापर्यंत आभार आभार मानावे तेवढे कमीच आहे.
पुढील,भावी जीवनातील शैक्षणिक कामकाज करत असतांना शिक्षक या पेशाला शोभेल असे कार्य येथून पुढे देखील आपल्या हातून अविरत घडत राहे, ज्या ठिकाणी आपली नियुक्ती झाली त्या ठिकाणी देखील आपल्या हातून अशीच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक व्हावी आणि त्या ठिकाणी देखील आपण एक सर्वोत्कृष्ट शिक्षक आहात हे सिद्ध करावे, आपले नाव देखील कायम स्मरणात राहील असेच कार्य आपल्या हातून घडावे आणि विद्यार्थ्याचे भवितव्य आपल्या माध्यमातून अधिक उज्वल व्हावे म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि पालकांच्या वतीने आपल्या खूप खुप शुभेच्या आपल्याला सर्वोत्तम असे निरोगी आयुष्य लाभो🥳🥳👏🏻🌼💐🙏🏻 मुख्याध्यापिका सौ.मनीषा विप्रदास, शिक्षिका मंदा कुलट,मनिषा कोष्टी, शिक्षक मारुती कुलट. सर्वांचे आभार....
- दिपक हरिश्चंद्रे (ग्रामस्थ,मिडिया प्रतिनिधी-
दैनिक प्रभात,
शिर्डी एक्सप्रेस)
आज नुसत्या शाळाच नाही गहिवरल्यातर संपूर्ण गावचं पोरकं झालंय अर्ध्यावर डाव मोडून जावा तसेच झाले सर खूप वाईट वाटले पण त्याला विलाज नव्हता आणि त्याची सवय आम्हाला जाधव सर गेल्यापासूनच झालेली आहे हे फक्त आमच्या खडांब्याच्या वाट्याला का येत हे कळत नाही मनात काही खूप काही दाटून येते पाचही शिक्षक आमच्या सदैव आठवणी त राहतील.
- जगदीश हरिश्चंद्रे ,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. खंडांबे खुर्द.
खरोखरच तुम्ही सर्व शिक्षकांनी मिळून आमच्या गावातील बालकांवर जे शैक्षणिक कामकाजाच्या पलिकडे जाऊन त्यांना त्यांच्या भावी जीवनातही उपयोगी पडेल असे संस्कार केले आणि आमच्या गावातील विद्यार्थी घडविले त्याबद्दल आपले सर्वांचेच आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमच्यातील प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून तुम्ही विद्यार्थी बरोबरच आम्हा पालकांना देखील आपलस केलं तुमचे ऋण आमच्यावर नेहमीच राहील. आपल्याला पुढील वाटचालीस आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.
- प्रभाकर हरिश्चंद्रे. (माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा माजी उपसरपंच खंडांबे खु.)
🙏 स्नेह भावी संदेश🙏
आपल्या खडांबे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदरणीय शिक्षक व मॅडम यांची बदली होऊन आज ते नवीन वेगवेगळ्या शाळेत रूजु झाले. त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा,त्या शाळेत त्यांना भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळो हि शुभेच्छा🙏
सर्व शिक्षकांनी ( यापूर्वीच बदली झालेले जाधव सर )
शाळेच्या व मुलांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले प्रयत्न व पालकांना दिलेले मार्गदर्शन, सहकार्य अतुलनीय आहे.
विद्यार्थ्यांप्रतिची त्यांची शिकवण , प्रेम ,जिव्हाळा व विद्यार्थ्यांना यश मिळावा यासाठीच केलेले प्रयत्न आदर्शमय राहिले. शाळेतील सार्वजनिक कार्यक्रम, केंद्र स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परिक्षा किंवा खेळ यामध्ये शाळा कायम आग्रेसर राहीली.
आपल्या सहवासातून विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन प्रेरणा हि कधीही न संपणारी आहे. आपण आमच्या शाळेत नसलात तरीही आपण केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कायम आपली आठवण करून देत राहील.
सहवास संपतो पण आठवणीतील काळ ,स्नेह व ज्ञानदानाचा दिलेला ठेवा कधीही संपत नाही .
धन्यवाद. 🌸🌸🌺🌺🙏🙏
-प्रविण हरिश्चंद्रे. (पालक)
सर/ मॅडम मुलांना शिकवायला तुम्हीच पाहिजे होते या शाळेत😔 सर्व शिक्षक वर्ग कायमच आठवणीत राहील पुढील वाटचालीस शुभेच्छा.
- सौ. भोकरे सुनीता. (पालक)
पैसापाणी, पगारबिगार मिळतच असतो पण प्रेम आणि माणुसकी मात्र कमावावी लागते. मिळणे आणि कमावणे यातला फरकही लक्षात येऊन जातो अशा प्रसंगी. माणूस प्यारा नसतो, काम प्यारे असते. विद्यार्थ्यांच्या जीवनात नवे शिक्षक येतील ; शिक्षकांच्या जीवनात नवे विद्यार्थी येतील .... अन् तरीसुद्धा ही जोडलेली नाती आयुष्यभर साथ देतील. काही दिवस मानसिक - भावनिक त्रास होतो . पण पुन्हा नवं राज नवा डाव मांडण्यातही मौज असते. मजा असते असं शून्य होणं आणि पुन्हा शून्यातून नवं विश्व निर्माण करणं. साने गुरुजींसारख्या कमालीच्या भावनाशील माणसानंही म्हटलं आहे," या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार , नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार , आईस देव माना वंदा गुरुजनांना , जगी भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा! " शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानायचे नि पुढे जायचे. शुभास्ते पंथान: सन्तु !
- मारुती कुलट माजी शिक्षक (जि.प.प्रा. शाळा खंडांबे खुर्द.) (बदली प्रक्रियेतील शिक्षक)
आपल्या सर्व पालकामुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानेच आम्हा सर्व शिक्षकांना काम करण्याची स्पूर्ती मिळाली ऊर्जा आणि प्रेरणा देखील आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.अगदी मनापासून धन्यवाद देखील मानतो. 👍🙏🏻
- जाधव सर, (माजी शिक्षक जि.प.प्रा. शाळा खंडांबे खुर्द.)
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600