धरणगाव प्रतिनिधी --धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून तसेच ढोल ताशे, फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले तसेच बाईक रॅली देखील संपन्न झाली.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे जळगाव जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले. जळगावच्या पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारी - कार्यकर्ते यांची बैठक व पत्रकार परिषद झाल्यानंतर नंदुरबार कडे शिंदे साहेब रवाना झाले. वाटेत धरणगाव शहरात ग्रामीण रुग्णालय जवळ पवार साहेबांच्या निष्ठावंत शिलेदारांनी फुलांचा वर्षाव करत तसेच ढोल ताशांचा गजर व फटाके वाजवून शशिकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत केले. सर्वप्रथम कुळवाडी भूषण - बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांना माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले तसेच सर्व बहुजन महापुरुषांच्या घोषणांनी आठवडे बाजाराचा परिसर दणाणून निघाला. यानंतर शिंदे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच घोषणा देत सर्व निष्ठावंतांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मोटारसायकल रॅली शिवरायांच्या स्मारकापासून एमआयडीसीत आली. उद्योजक एकनाथ पाटील यांच्या सर्वज्ञ इंडस्ट्रिज येथे प्रदेशाध्यक्ष व सर्व नेते मंडळींनी सदिच्छा भेट दिली. याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा प्रेमळ सत्कार स्वीकारला. जे गेले त्यांची फिकीर न करता जे आहेत त्यांना घेऊन पक्षाचे संघटन मजबूतीने उभे करू. एवढंच नव्हे तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास देखील श्री शिंदे यांनी दिला. यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा ताफा अमळनेर मार्गे नंदुरबारच्या दिशेने रवाना झाला. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहार व चहा घेऊन कार्यक्रमाचा उत्साहात समारोप पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा निरीक्षक भास्कर काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी, माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, युवक अध्यक्ष विश्वजित पाटील, महिला तालुकाध्यक्षा आशा पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रा एन डी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डी एस पाटील सर, माजी सरपंच डॉ विलास चव्हाण, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, जेष्ठ नेते सुभाष पाटील, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, ओंकार माळी, विनायक पाटील, रमेश सपकाळे जांभोरे, जानकीराम पाटील, रविंद्र पाटील आव्हानी, प्रकाश पाटील, मकरध्वज पवार भोणे, दिलीप पाटील, किशोर पाटील, अरुण पाटील, मयूर पाटील, गोपाल पाटील, चेतन पाटील, नितीन पाटील साळवा, सुभाष पाटील, समाधान पाटील निशाने, भैय्यासाहेब पाटील रोटवद, विकास भदाणे बिलखेडा, भाऊसाहेब पाटील, आधार पाटील, दिलीप पाटील सर टहाकळी, रमेश पाटील, चत्रू पाटील चमगांव, शशिकांत पाटील शेरी, उमेश पाटील, शरद पाटील अंजनविहरे, अनिल पाटील बोरगाव, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, गणेश पाटील, रविंद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रदीप पाटील, काशिनाथ रणसिंग, रविंद्र रणसिंग, संजय रणसिंग, राजेंद्र पाटील पिंपळे, नितीन पाटील निंभोरा, भाईदास पाटील भवरखेडे, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, व्यावसायिक रमेश महाजन, अमित शिंदे, खलील खान, गोपाल पाटील, भगवान शिंदे, रवि महाजन, समाधान महाजन, पंकज पारधी, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, कार्याध्यक्ष साईनाथ पाटील, राजेंद्र पाटील, सतिष पाटील, बाभुळगाव, उपाध्यक्ष राहुल पाटील, योगेश पाटील, प्रमोद पाटील, युवा नेतृत्व वाल्मिक पाटील, रविंद्र पाटील, अजय सोनवणे, अशोक गजरे बाभळे, जुनेद बागवान, साजिद कुरेशी, सागर महाले, प्रकाश लांबोळे, राहुल पाटील, बब्बू शेख, रमजान शाह, सागर पारधी, राधेशाम जावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.