shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गणेशनगर येथे भागवत काटकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने गणरायाची आरती व अन्नदान.

वडापुरी  गणेशनगर येथे भागवत काटकर व त्यांच्या परिवाराच्या   वतीने गणरायाची आरती व  अन्नदान.
इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर )  रामवाडी गणेशनगर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त वडापुरी येथील प्रगतशील बागायतदार तसेच माजी उपसरपंच भागवत काटकर व त्यांच्या त्यांच्या परिवाराच्या समवेत गणरायाची आरती व त्यांच्या वतीने अन्नदान  करण्यात आले.
 गणेशनगर येथील  गणराया नवसाला पावणारा म्हणून त्याची ओळख असून वडापुरी गावाच्या  दक्षिण भागात  असणाऱ्या गणेश मंदिरात गेली सात वर्षापासून प्रत्येक संकष्टी व अंगारकी  चतुर्थीला भजन,आरती व अन्नदान केले जाते. या भागातील लहान थोर पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात चंद्र उदयाच्या साक्षीने  गणरायाची आराधना करतात.
close