shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोले तालुक्याचा अतिवृष्टी व पूर आपत्ती विशेष पॅकेज मध्ये समावेश करा:- भाऊसाहेब वाकचौरे

मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
अकोले ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज मध्ये अकोले तालुक्याचा समावेश करण्यात यावा व सवलती घोषित करण्यात याव्या अशी मागणी भाजपा चे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे. 

         महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुका हा पाऊसाचे आगार आहे येथे चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर मध्ये नगर जिल्ह्यात सर्वात पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. पाऊसाची आकडेवारी वरून आपण हे पाहू शकता. 
       अकोले तालुक्यात पाऊस झाला नाही तर भंडारदरा, निळवंडे, आढळा, मुळा, म्हाळुंगी, कोटमारा धरणे भरली कसे सवाल व्यक्त केला आहे. 
         अकोले तालुका आदिवासी तालुका असून या तालुक्यातअकोले तालुक्यात ४४७ मी.मी पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यात झाला असून ब्राम्हणवाडा, साकिरवाडी या महसूल मंडळात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस असून तालुक्यातील पावसावर सर्व धरणे भरली आहे. ४४७ मी.मी हा पाऊस इतर तालुक्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे अकोले तालुक्याचा समावेश विशेष मदत पॅकेज मध्ये करण्यात यावा. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवण्याची क्षमता अकोले तालुक्यात आहे. आणि शेतीचे मोठे नुकसान होते मात्र यावर्षी अति प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे परंतु सरकारने विशेष पॅकेज मध्ये अकोले तालुक्याचा समावेश केला नाही ही बाब गंभीर असून या तालुक्यावरती मोठा अन्याय झालेला आहे या पॅकेजमध्ये असलेले फायदे म्हणजे जमीन महसूल मध्ये सूट तसेच शैक्षणिक सवलती व  कर्जाचे पुनर्गठन व कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात यावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी आहे मात्र अकोले तालुक्यामध्ये कुठले प्रकारचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही तसेच शेतकऱ्यांना कुठली मदत जाहीर न करता शेजारचे सिन्नर जुन्नर व संगमनेर या तालुक्यांचा समावेश असताना एकट्या अकोले तालुका वगळण्यात आला आहे तरी अकोले तालुक्याचा या विशेष मदत पॅकेज मध्ये तातडीने समावेश करावा अशी मागणी श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठवण्यात आले आहे.
 जमीन महसूल मध्ये सूट तसेच शैक्षणिक सवलती व  कर्जाचे पुनर्गठन व कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात यावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी आहे
- भाऊसाहेब वाकचौरे
close