शिर्डी आरबीओ ‘रिजनल सेक्रेटरी’ या पदावर निवड !
अजिजभाई शेख / राहाता:
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले नवाज अल्लाबक्ष देशमुख यांची राहाता तालुक्यातील शिर्डी येथील रिजनल बिझनेस ऑफिस (RBO) येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ या महत्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत कार्यरत असून त्यांनी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ शाखेत त्यांच्या कार्यकाळात ग्राहकाभिमुख सेवा, तत्पर प्रतिसाद आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे शाखेचे कामकाज अधिक गतिमान झाले. त्यांनी ग्राहक समाधानावर भर देत बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची शिर्डी आरबीओ येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे राहुरी तसेच विद्यापीठ परिसरातील ग्राहकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशमुख यांनी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “भारतीय स्टेट बँकेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पेलविण्याचा प्रयत्न करीन. ग्राहकसेवा हीच माझी प्राथमिकता राहील,” असे ते म्हणाले. त्यांच्या या यशाबद्दल राहुरी कृषी विद्यापीठ स्टेट बँकेच्या शाखेचे अधिकारी प्रवीण रक्ताटे, प्रतीक अभंग, कर्मचारी रामदास मामा उनवणे, चंद्रकांत साळवे मेजर, बा.नांदुर येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र कोहकडे यांनी सत्कार करत देशमुख साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या नियुक्तीमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय स्टेट बँक शाखेचा गौरव अधिक उंचावला आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार जावेद शेख - राहुरी
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111