shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात विकासपर्वाचा शुभारंभ! ​राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हारूनभाई इनामदार यांच्या हस्ते महात्मा फुलेनगर मुख्य रस्त्याचे व नालीचे उद्घाटन!



प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी 

​केज शहरात 'विकासपर्व' (वार्ड क्र. 07) अंतर्गत महात्मा फुलेनगर येथील महत्त्वपूर्ण विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हारूनभाई इनामदार यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. उजगरे सर यांच्या घरापासून ते राजेंद्र सोनवणे यांच्या घरापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे आणि नवीन नालीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले, यामुळे वॉर्डातील नागरिकांची 'वचनपूर्ती' झाली असून, मोठी सोय झाली आहे.
​याप्रसंगी नगराध्यक्ष सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
या 'विकासकामे' सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक नवनाथ धिवार सर, पाशाभाई शेख, तात्या गवळी, बालासाहेब जोगदंड सर, नितीन धिवार सर यांचा समावेश होता.

​तसेच, युवा नेते शाहरुख पटेल, असेफ शेख, विवेक बनसोड, धम्मानंद गायकवाड, अश्रुबा जोगदंड, जतीन धीवार, अशोक धिवार, अशोक क्षीरसागर, राहुल इनकर, सुहास समुद्रे, किरण जोगदंड, सुशील रोकडे, आत्माराम मस्के आदींसह भागातील युवक व महिला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
​उपस्थित महिलांमध्ये भाग्यश्री गायकवाड, प्रमिलाताई मस्के, बंडूबाई मस्के, मैनाबाई साळवे, क्षीरसागर मावशी, अंजनाताई जावळे, लोचनाबाई समुद्रे, विमलताई जोगदंड, सोनालीताई समुद्रे, कचरूबाई मस्के, कौशल्य मस्के यांचा सक्रिय सहभाग होता.

​यावेळी बोलताना हारुणभाई इनामदार यांनी स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले आणि भविष्यातही वॉर्डातील सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. या रस्त्यामुळे भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, वॉर्ड क्र. 07 मध्ये खऱ्या अर्थाने 'विकासपर्वा'ला सुरुवात झाली आहे.
close