प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे, हा विश्वास देत कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे (साहेब) व त्यांच्या सहकाऱ्यांनी (बाळासाहेब अहंकारे, काजी व इतर) शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांच्या सुरक्षारक्षणाच्या उपक्रमात स्वतः सहभाग नोंदवला.
पोलिसांनी रात्रीची गस्त व राऊंड सुरू असताना, शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या 'संध्याकाळच्या राऊंड' मध्ये सहभाग घेतला. या भागातील नागरिकांच्या या सतर्कतेचे व सामूहिक प्रयत्नांचे पोलिस प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक उनवणे साहेबांनी नागरिकांना संबोधित करताना, "आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत," असा आश्वासक शब्द दिला, ज्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढला.
संपूर्ण शहरवासियांना सतर्क राहण्याचे आवाहन
यावेळी पोलिस प्रशासनाने केज शहरातील विविध भागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी देखील आपापल्या भागात वाढत्या थंडीमुळे रात्रीचे राऊंड चालू करावे आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी सतर्क राहावे. नागरिकांचा सक्रिय सहभाग सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमात पञकार प्रकाश मुंडे, पिटू भैया तांदळे, रवि घुले, गोटू भैय्या पाळवदे, अमोल मुंडे, मोहसीन शेख, शशिकांत ढाकणे सर, घुले साहेब, तसेच शिक्षक कॉलनी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

