shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिमनपुरी पिंपळे येथे डिजिटल अभ्यासिकेचे लोकार्पण.

विद्यार्थ्यांसाठी MPC–UPC पुस्तके, LED टीव्ही व स्पर्धा परीक्षांचे मोफत डिजिटल मार्गदर्शन.
चिमनपुरी पिंपळे येथे डिजिटल अभ्यासिकेचे लोकार्पण.

चिमनपुरी पिंपळे (ता.अमळनेर) येथे श्री गुरुदेव दत्त संस्था यांच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष निबा दला चौधरी यांचे सुपुत्र, कामगार आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी भैरवीताई पलांडे, पिंपळे खु. गावाच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, पिंपळे बु. गावाचे उपसरपंच योगेश पाटील, सदस्य संतोष चौधरी, गोकुळ पाटील, पुरुषोत्तम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डिजिटल अभ्यासिका तसेच डिजिटल कक्षातील LED टीव्हीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना MPC व UPC स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच विजय चौधरी यांच्याकडून अभ्यासिकेसाठी LED टीव्ही, महत्त्वाची संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑनलाईन क्लास लिंकही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

close