गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याचे योग शिबिर उत्साहात सुरू.
एरंडोल — कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या अभ्यासक्रमांतर्गत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे किशोरवयीन मुला-मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठाकरे, उपप्राचार्या श्रीमती ज्योती वडगावकर व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गुलाबी थंडीच्या सकाळी आयोजित या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी सौ. देवयानी महाजन व वैष्णवी पाटील मार्गदर्शन करत आहेत. सदर शिबिर एक महिना चालणार असून, यासाठी विद्यापीठातील प्रा. राजेश पाटील, प्रा. लीना चौधरी, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. लिंता चौधरी यांचे मार्गदर्शन तसेच ग्रामीण उन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ विसपुते व श्रीमती अंजुषा चव्हाण यांचे सहकार्य लाभत आहे.
योगाच्या माध्यमातून शारीरिक-मानसिक आरोग्य घडविण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



