shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसादनगरच्या सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करा..! अप्पासाहेब ढुस

२६ जानेवारी रोजी शौचालयात साठलेलं महिला वाजत गाजत नगरपरिषद कार्यालयात टाकणार..!
आप्पासाहेब ढूस, जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.

देवळाली प्रवरा - १ जानेवारी 
प्रसादनगरच्या सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करा..! अन्यथा.., २६ जानेवारी २०२६  रोजी सकाळी १०.०० वाजता या शौचालयात साठलेला मैला वाजत गाजत नगरपरिषद कार्यालयात टाकणार..! असल्याचा इशारा  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी निवेदनाद्वारे देवळाली प्रवरा नगरपरिषदेला दिला आहे.
     या निवेदनात ढूस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात नगर परिषदेने दोन सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत. या दोन्ही सार्वजनिक शौचालयांचे कित्येक वर्षांपासून दरवाजे तुटलेले आहेत. शौचालयात लाईट नाही. पाणी सुविधा नाही. भांडी फुटलेले आहेत. तसेच.. सेप्टिक टॅंक तुंबलेला आहे. त्यामुळे शौचालयातील फुटलेली भांडी मैल्याने भरून वाहत आहेत. अशा अवस्थेत येथे लहान मुले, माता भगिनी, व ज्येष्ठ नागरिक या शौचालयांचा अत्यंत कीळसवान्या अवस्थेत नाविलाजास्तव वापर करीत आहेत. त्यामुळे, येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून.. कोणत्याही क्षणी येथे साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊन येथील नागरिकांचे प्राण जाऊ शकतात.. तथापि,  नगर परिषद अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते या शौचालयांची दुरुस्ती करीत नाहीत.
      नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण यांनी स्वच्छतेच्या बाबतीत नगर परिषदेला राज्यात नावलौकिक मिळवून दिला आहे.. आता आम्ही देशात व देशाबाहेर नगरपरिषदेचा नवलौकिक वाढविण्याचे स्वप्न पाहत आहोत. परंतु, ज्यांना आम्ही आमच्या घरची वाघीन समजतो.. अशा आमच्या माता भगिनींना जर दरवाजा, तसेच.. स्वच्छ पाण्याची सोय व लाईट नसलेल्या व भांडी तुंबलेल्या अवस्थेत या सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत असेल.. तर, देश पातळीवर नगरपरिषदेचा नवलौकिक वाढविण्याचे स्वप्न पाहण्याची अद्याप आमची पात्रता नाही. असेच या निमित्ताने म्हणावे लागेल..

       सबब.. आपणास विनंती की, तात्काळ या शौचालयांची दुरुस्ती करावी.. अन्यथा, या शौचालयात साठलेला मैला २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वा.  वाजत गाजत नगरपरिषद कार्यालयात आणून टाकला जाईल.. व, त्यामुळे.. उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषदेची राहील याची नोंद घ्यावी.. असे निवेदनाच्या शेवटी आप्पासाहेब ढूस यांनी म्हटले आहे.

     या निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच  जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि तहसीलदार व पोलीस निरीक्षक साहेब राहुरी यांना दिल्या आहेत.
close