shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल महाविद्यालयात मासिक पाळीविषयी जागृती, सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप.

ऋतुमती अभियानांतर्गत २५८ विद्यार्थिनींना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक.
एरंडोल महाविद्यालयात मासिक पाळीविषयी जागृती, सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप.

एरंडोल :- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत युवती सभा मंच व सोफी सॅनिटरी पॅड कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. युवती सभा सचिव डॉ. रेखा साळुंखे तसेच कंपनीच्या प्रतिनिधी सिमीरन कौर व सोनिया कुमार यांनी मासिक पाळीदरम्यान होणारे शारीरिक-मानसिक बदल, पीसीओडी व प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती दिली.

एरंडोल महाविद्यालयात मासिक पाळीविषयी जागृती, सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप.

महाविद्यालयात उपलब्ध सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीनच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालय व जिजामाता माध्यमिक विद्यालयातील एकूण २५८ विद्यार्थिनींनी घेतला.

कार्यक्रमास संस्थाध्यक्ष मा. अमितदादा पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापकवर्ग व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

close