उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत शहरात 28 जून 2026 रोजी पोलिओ मोहीम राबविण्यात येत असून तब्बल 19 वर्ष निरंतर ही मोहीम भारतात राबवली गेली सन 2014 मध्ये आपला भारत देश पोलिओ मुक्त देश म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले असले तरी आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये अजूनही पोलिओचे रुग्ण निघत असल्यामुळे पल्स पोलिओ मोहीम राबवावी लागते मोर्शी शहरात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 21 पोलिओ बूथ ची व्यवस्था करण्यात आलेली आहे
शहरात उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, नितीन उमाळे यांचे घराजवळ, नगरपरिषद शाळा क्रमांक 1, समाज मंदिर खोलवाटपुरा, हनुमान व्यायामशाळा, रामजी बाबा मंदिर, नगरपरिषद शाळा क्रमांक 2, सावता अंगणवाडी माळीपुरा, तारा माता मंदिर, नगरपरिषद कार्यालय, पुष्पा देशमुख, डॉक्टर जयस्वाल पेटपुरा, नगरपरिषद शाळा फरीद कॉलनी, बुद्धविहार पाण्याची टाकी, नगरपरिषद शाळा क्रमांक 4, अभंग हॉस्पिटल, नगरपरिषद शाळा पुनर्वसन कॉलनी, डॉक्टर जाणे दवाखाना, मंजुषा पवार दवाखाना, नगरपरिषद यशवंत नगर शाळा, गोपाळराव वानखडे शाळा तसेच प्रवासामध्ये असलेल्या बाळांना बस स्टॉप, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात येत असून येत्या 28 जून रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना वरील पोलिओ बूथवर पोलिओ डोज पाजून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांनी केले.

