shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद युवा दिन जयंती संपन्न...*

*श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद युवा दिन जयंती संपन्न...*
     इंदापूर: सोमवार दि: 12 जानेवारी 2026 रोजी श्री शिवाजी विद्यालयात राजमाता राष्ट्रमाता वीर कन्या वीर पत्नी वीर माता स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब यांची 428 वी व स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक  लोहकरे आर.बी. हे होते.
 अध्यक्षीय सूचना सौ सय्यद एस आर  यांनी मांडली तर  कांबळे ए ए  यांनी अनुमोदन दिले. 

   यावेळी प्राचार्य  घोगरे डी आर , तांत्रिक विभाग प्रमुख  घोगरे डी बी  तसेच सर्व अध्यापक अध्यापिका व इतर कर्मचारी जिजाऊंच्या वेशभूषेतील असणाऱ्या जिजाऊ कन्या यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पाटील डी ए  यांनी केले.
 यावेळी इयत्ता पाचवीतील समृद्धी भोसले, सृष्टी कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
 तसेच शिक्षक मनोगता मध्ये सौ ताटे  व सौ भोसले  यांनी आपले विचार व्यक्त केले.
 
याप्रसंगी अविष्कार एज्युकेशन सोशल फाउंडेशन कोल्हापूर तर्फे  मुलाणी एस टी यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार -शिरवळ-सातारा येथे मिळाल्याबद्दल प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन प्राचार्य  घोगरे डि आर सर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. 
तसेच इंदापूर हिंदी अध्यापक संघातर्फे उपक्रमशील शिक्षिका म्हणून खतीब पी एस  यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान संपन्न झाला. 

तसेच निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.*

   *आजच्या या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी जिजाऊंची अतिशय सुंदर अशी वेशभूषा साकारलेले होती. त्या विद्यार्थिनींच्या समवेत संस्थेचे संचालक  उदयसिंह पाटील यांनी त्यांच्याबरोबर फोटोसेशन केले. तसेच त्यांचे कौतुकही केले. त्याचबरोबर  मुलाणी एस टी  यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.* 
 यावेळी राजनंदिनी सुतार या विद्यार्थिनींनी जिजाऊ वंदना सादर केली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सातपुते डी एल यांनी केले.* 
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  कदम एस व्ही  यांनी केले.* 
 *
close