shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
इंदापूर  :  येथील श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर मध्ये "जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद " यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व महिला शिक्षक व जिजाऊंच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते प्रथम जिजाऊंच्या  व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोस पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय अशी भाषणे सादर केली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन  अक्षय वजाळे सर यांनी राजमाता जिजाऊंबद्दल व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती देऊन केले तसेच  "जिजाऊ वंदना"गीतावर इयत्ता 6 वी च्या विद्यार्थिनींनी अप्रतिम नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे खास आकर्षण आणि उपस्थितांची मने जिंकली ती श्री. मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या लाठी काठी या मर्दानी खेळाने यावेळी उपस्थितांमध्ये थरारक चित्र निर्माण झाले.*

           *यावेळी सौ. अंजली गुजर व फाळके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले,तर आभार सौ.नूतनरणसिंग पाटील यांनी मानले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.फौजिया शेख मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री  हर्षवर्धनजी पाटील  तसेच संस्थेचे  संचालक  राजवर्धन पाटील यांनी  कौतुक केले व सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .*
close