shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीर संभाजी भगत यांचा श्रीरामपूर शहरात जाहीर सत्कार..

शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
संविधानचे अस्तित्व अबाधित राखणे हे आव्हान स्वीकारुन प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांची आठवण ठेवून विद्रोही साहित्य संमेलन दिनांक २ व ३ मे २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होत आहे.संमेलनाचे निय़ोजित अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांची निवड झाली आहे.या निमित्ताने विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर च्या वतीने लोकशाहीर संभाजी भगत यांचा बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वा. आझाद मैदान मेनरोड श्रीरामपूर येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे यांनी दिली.


या कार्यक्रमास विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रदेशाध्यक्ष कॉं.धनाजी गुरव, राज्यसचिव डॉ.जालिंदर घिगे, राज्य प्रवक्ते साथी विजय मांडके उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ सलिम शेख , जिल्हा उपाध्यक्ष संतोष त्रिभुवन, जिल्हा सरचिटणीस मधुकर विधाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य शाहीर भिमराव कदम,प्रा.भास्कर बुलाखे,शाहीर शशिकांत विधाटे,कवी गंगाभाऊ काकडे,स्वप्नील धांडे,संघटक ॲड.अमोल सोनवणे, ॲड.कुमार भिंगारे, ॲड अण्णासाहेब मोहन,कवी आनंदा साळवे, गझलकार रज्जाक शेख,विजय जगताप, इम्तियाज पठाण,राजु शेख, इकबाल काकर, देविदास कोकाटे,महेश साळवे,अकबर शेख,के सी दाभाडे यांनी केले आहे.
close