shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी

रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.  बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे व आमदार किरण लहामटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


  अकोल्यातील विविध शाळांमधील मुलांनी शिवरायांच्या  जीवनातील जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्याचे विविध प्रसंग तसेच त्यांचा पराक्रम व शौर्य  दर्शविणारे विविध ऐतिहासिक घटना दर्शविणारे अंगावर रोमांच उभे करणारे प्रसंग भव्य रंगमंचावर नृत्य नाट्याच्या माध्यमातून सादर केले.विद्यार्थ्यांच्या या जोषपूर्ण नृत्यांनी अकोलेकरांची मने जिंकली. स्वाभिमान,शौर्य, आणि पराक्रम यांचे प्रतीक असणाऱ्या शिवछत्रपतींच्या चरणी नृत्य रूपाने सादर केलेली सर्वांचेच मनाला स्पर्शून गेली. ओघवत्या शब्दांमधील भावपूर्ण निवेदन, पाळणा गीतापासून भवानी मातेच्या गोंधळ गीतापर्यंतच्या विविध जोषपूर्ण गीतांच्या साथीने महाराजांचे बालपण ते पावनखिंडीची लढाई अन् औरंगजेबाचा वध अश्या दृश्यांचे नृत्यमय सादरीकरण राज्याभिषेकाचा उत्साह,आरती,
अंगावर शहारे आणणारा पोवाडा, लाठी काठी चे थरारक प्रसंग, शिवकन्या ग्रुप चे लेझीम पथक या सर्वांमुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तर अकोलेकरांनीही बक्षीसरूपाने भरभरून दाद दिली. 

    या समूह नृत्य स्पर्धेत विजयी पुढील  मॉडर्न हायस्कूल,अकोले ने प्रथम क्रमांक, जि.प.प्रा.शाळा उडदावणे द्वितीय क्रमांक, अगस्ति विद्यालय तृतीय क्रमांक तर परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल चतुर्थ क्रमांक मिळविला.  सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र  अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या व पदमश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने नेहमीच उत्कृष्ट सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य क्षेत्रात भरीव उपक्रम राबवित असून त्यांचे अकोले तालुक्याच्या विकासात मोठे योगदान आहे .त्यांच्या या विकासात आपण सर्व अकोलेकर सहभागी होऊ तसेच रोटरी क्लब ने फोपसंडी गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करावा असे आवाहन केले.अकोले शहरातील नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, प्रवरा परिसर सुंदर करण्याचे आश्वासन देऊन पालकांनी आपल्या मुलाना व्यसनापासून दूर ठेवावे व स्वतः ही दूर रहावे असे मत व्यक्त केले.आजची शिवजयंती स्मरणात राहणारी असून पुढेही शिवजयंती उत्सव चालू ठेवावी असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा.हेमंत मंडलिक   यांनी केले तर कार्यक्रम 
यशस्वीतेसाठी रोटरी क्लब च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.


सादर केलेले कार्यक्रम-
 धामणगाव आवारी जि प प्रा शाळा ( विजय सैन्य महोत्सव ),
स्वामी विवेकानंद विद्यालय विरगाव  (गोंधळी गीत व त्यावर नृत्य ), मॉडर्न हायस्कुल अकोले (बाल शिवाजीचा पाळणा, बालपण ते  अफजलखान  वध, जीवनपट ), कन्या विद्या मंदिर,अकोले (स्वराज्याची शौर्य गाथा), न्यू इंग्लिश स्कुल,रुंभोडी ( पावनखिंड ची शौर्य गाथा), जि. प.प्रा.शाळा  उडदावणे (भवानी मातेचा गोंधळ), परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल,अकोले (अफजलखान वध), अगस्ति विद्यालय अकोले (छत्रपती शिवाजी महाराज जीवन प्रवास), राजेंद्र गुरकुले व सहकारी(लाठी काठीचे थरारक प्रसंग), शाहीर रेवणनाथ देशमुख व बाल शिव शाहीर कृष्णा नवले ( पोवाडा), शिवकन्या ग्रुप( लेझीम पथक)
close