वडाळा महादेव [ वार्ताहर ] श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान दावल मलिक बाबा व वीरभद्र महाराज यात्रा उत्सव यानिमित्त यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिनांक २४ ते २६ या कालावधीत यात्रा उत्सव संपन्न होणार आहे
मंगळवार दिनांक २४ रोजी सायंकाळी यात्रा उत्सव समिती ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थ तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संदल मिरवणूक तसेच दर्गाह या ठिकाणी विधीवत पूजन तसेच बुधवार दिनांक २५ रोजी सायंकाळी आठ वाजता छबिना मिरवणूक तसेच लोककलावंत मा जगन कुमार वेळवंडकर तसेच सहकारी लावणी सम्राज्ञी हौसाराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा तसेच दिनांक २६ रोजी सकाळी आठ वाजता हजेरी कार्यक्रम होणार आहे यानंतर दुपारी दोन ते सहा या कालावधीत भव्य बैलगाडा शर्यत अशा विविध कार्यक्रमाचे निपाणी वडगाव यात्रा उत्सव समिती यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे दर्गाह तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यात येत असते सदरचे देवस्थान हे नवसाला पावणारे असून या ठिकाणी या कालावधीत नवस स्फूर्ती नैवेद्य शेरणी प्रसाद वाटप असे कार्यक्रम परिसरात संपन्न होतात.
यावेळी मिठाई तसेच खेळणी चे दुकाने थाटले जातात तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

