shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती उत्साहात साजरी.

वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती उत्साहात साजरी.


एरंडोल – दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा. दादासाहेब अमित राजेंद्र पाटील (अध्यक्ष – य.च.शि.प्र.म., एरंडोल) होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, मराठी विभाग प्रमुख ए. टी. चिमकर, प्रा. डॉ. एस. ए. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. बी. गायकवाड व कुलसचिव श्री. एस. एस. बोरसे यांच्या हस्ते शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात मा. अमितदादा पाटील यांनी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगितले. व्यवहारात, शिक्षणात व दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच काळाच्या ओघात मराठी भाषेची उज्ज्वल परंपरा जपली जावी, याबाबत त्यांनी मौलिक विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी केले. महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रंथालय विभागात वि. वा. शिरवाडकर लिखित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. एन. बी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शर्मिला गाडगे यांनी मानले.

close