shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील युवा उद्योजक विश्वजित गोंदकर यांना नाशिक प्रदर्शनात उस्फूर्त प्रतिसाद

शिर्डीतील युवा उद्योजक विश्वजित गोंदकर यांना नाशिक प्रदर्शनात उस्फूर्त प्रतिसाद

नगर प्रतिनिधी:
शिर्डी - येथील विश्वजीत दिलीपराव गोंदकर व सौ प्रणाली विश्वजीत गोंदकर या दाम्पत्यांनी यावर्षी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषीकुंभ २०२६ या प्रदर्शनात सहभाग घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. प्रदर्शनात त्यांनी आपल्याच शेतातील नैसर्गिकपणे पिकविल्रेल्या विविध फळे व भाजीपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या पावडरची विक्री करून या पावडरमुळे मानवी शरीराला विविध प्रकारचे कसे फायदे होतात हे दाखवून दिले. या कृषीकुंभात त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांच्या प्रदर्शनातील स्टाॅलला कृषिभूषण फेडरेशनचे श्री भुषण निकम,कृषी विभागाचे संचालक जगदीश पाटील,इगतपुरीचे कृषी अधिकारी राजेंद्र काळे,डीआरपीचे पाटील साहेब ,निर्मळ साहेब , सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र पवार साहेब,नाशिक जिल्ह्यातील युटूबवर प्रसिद्ध असलेले ब्लॉगर व वक्ते दिपक अहिरे सर ,शिर्डीचे मा.नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर ,गणेश जाधव आदींसह जळगाव,धुळे,व नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील कृषी अधिकारी भेट देऊन गेले,यावेळी त्यांनी गोंदकर दांपत्याने सुरु केलेल्या प्रकल्पाचे कौतुक केले.सौ.प्रणाली गोंदकर यांनी महिला बचत गटातील महिलांना याबाबत विनामूल्य प्रशिक्षण दिले.यामाध्यमातून शिर्डी शहरातील गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध झाला.
close