shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईभूमीत पैशांपेक्षा प्रामाणिकपणा मोठा! हरवलेले पैंजण परत करून सोसायटी कर्मचाऱ्याने जपला आदर्श



शिर्डी प्रतिनिधी :
श्री सद्गुरू साईबाबांच्या पवित्र भूमीत आजही पैशांपेक्षा प्रामाणिकपणा आणि मूल्ये महत्त्वाची मानली जातात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा शिर्डीत आला आहे. एका महिला भाविकाचे हरवलेले पैंजण प्रामाणिकपणे परत करून श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी श्री. मिनिनाथ गुलदगड यांनी सर्वांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळवाडी रोडवरील गेट नंबर १ जवळील मोबाईल लॉकर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला साईभक्ताचे पैंजण गर्दीत हरवले होते. हे गहाळ झालेले पैंजण सोसायटीचे कर्मचारी श्री. मिनिनाथ गुलदगड यांना सापडले. कोणताही मोह न ठेवता त्यांनी तात्काळ हे पैंजण श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात (Security Office) जमा केले.
काही वेळाने सदर महिला भाविक अत्यंत चिंतेत आपल्या हरवलेल्या पैंजणाचा शोध घेत संरक्षण कार्यालयात आल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शहानिशा करून त्यांना त्यांचे पैंजण सुरक्षितपणे परत केले. हरवलेली मौल्यवान वस्तू सुखरूप परत मिळाल्याने त्या महिला भाविकाने श्री. गुलदगड आणि साई संस्थानचे मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस आणि पदाधिकाऱ्यांकडून सत्कार व कौतुक
श्री. मिनिनाथ गुलदगड यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत संरक्षण कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक रोहिदासजी माळी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच, त्यांच्या या स्पृहणीय कार्याबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते आणि संचालक रामजी गागरे, सचिव विलासराव वाणी यांनी गुलदगड यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुलदगड यांच्या या कृतीमुळे साईबाबांच्या दरबारातील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर भाविकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
close