महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन; गागरे परिवाराकडून उपस्थितीचे आवाहन
शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी येथील रहिवासी कै. काशिनाथ सयाजी गागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येत्या रविवारी, दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी शिर्डीत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कनकुरी रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
स्वामी काशिकानंदजी महाराजांचे प्रवचन
कै. काशिनाथ गागरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाप्रसादाचे (भोजनाचे) आयोजन
प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, दुपारी १२ ते ४ या वेळेत उपस्थित भाविक आणि नागरिकांसाठी भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "चंदनापरी देह झिजविला कष्टातून वसंत फुलविला..." या भावना व्यक्त करत कुटुंबाने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी उपस्थित राहून कै. काशिनाथ गागरे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी विनंती शोकाकुल गागरे परिवार— पत्नी श्रीमती ताराबाई, मुलगा श्री रंभाजी, मुली सौ. लता गोरडे व सौ. सविता गोत्राळ, तसेच पुतणे व नातवंडे यांच्यासह समस्त परिवारातर्फे करण्यात आली आहे.

