राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. भगवान पगारे यांच्या मातोश्री स्व. सुशीला जयाजी पगारे यांच्या निधनाने पगारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत पगारे परिवाराचे सांत्वन केले व दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्व. सुशीला पगारे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत भगवान पगारे व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. कठीण काळात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संपूर्ण ताकदीने पगारे परिवाराच्या पाठीशी उभा असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

स्व. सुशीला पगारे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सावळीविहीर येथे करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या सांत्वनपर भेटीप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ma. बाळासाहेब आढांगळे, महाराष्ट्र राज्य सचिव मा. प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा सचिव मा. राजपाल शेगोकार तसेच उरण तालुकाध्यक्ष मा. प्रविण नाईक उपस्थित होते