साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय महाजन यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव
शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साईसेवेच्या माध्यमातून सातत्याने समाजहितासाठी कार्यरत असलेल्या संजय महाजन यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रदीपजी वैद्य, भारतीय जनता पार्टी शिर्डी शहरचे उपाध्यक्ष व सावता महाराज मंदिर ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष सुधीर शिंदे, शिर्डी शहर ओबीसी मोर्चा भाजप उपाध्यक्ष गणेश खैरे, पप्पू इंगोले, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे सदस्य छोटू सोनवणे, सुनील सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संजय महाजन यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
संजय महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे कार्य करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि जनहिताच्या विषयांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे नेहमीच प्राधान्य दिले आहे. तसेच साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पत्रकारिता ही केवळ बातमीपुरती मर्यादित न ठेवता, समाजहितासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून वापरण्याचे काम संजय महाजन यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी, मनमिळावू स्वभाव, सर्वांशी आपुलकीने वागण्याची पद्धत आणि सेवाभावी वृत्ती यामुळे ते शिर्डी शहरात सर्वपरिचित आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारप्रसंगी उपस्थितांनी संजय महाजन यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजसेवा, पत्रकारिता आणि साईसेवेचा त्यांचा प्रवास असाच अखंड सुरू राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकार संजय महाजन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्कारामुळे त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला मान्यता मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

