shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंञी ना.राधाकृष्ण विखे पा.यांचा वाढदिवस , आओ साई खंडोबा देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..!!


"विकासपुरुष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिरात महामृत्यूंजय जप , अन्नदान महाप्रसाद परिसरातील शाळा विद्यालयात शालेय साहित्य वाटप..!

शिर्डी प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आओ साई खंडोबा देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाचा हातभार लागणार असून, उपस्थितांकडून या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.
वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याची सुंदर परंपरा या उपक्रमातून पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शालेय उपयोगी साहित्य देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी आओ साई खंडोबा देवस्थानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजसेवा, विकास आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचेही आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या कार्यक्रमाचे खरे यश असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक बांधिलकी, शिक्षणप्रेम आणि सेवाभावाचा सुंदर संदेश गेला असून, आओ साई खंडोबा देवस्थानच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close