निरवांगीतील रेशीम उद्योगाची पाहणी; शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अजिंक्य कांबळे यांचे कौतुक!
निरवांगी : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील रेशीम उत्पादक व युवा मार्गदर्शक श्री. अजिंक्य कांबळे यांच्या ‘अजिंक्य चौकी रिअरिंग सेंटर’ला जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले व इंदापूर पंचायत समितीचे सदस्य तथा युवा नेते श्रीराज भरणे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच विविध उपक्रमांची पाहणी करून रेशीम उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना या व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत जाणून घेतले.
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे, दर्जेदार रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील युवकांना रेशीम उद्योगाकडे आकर्षित करणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अजिंक्य कांबळे व त्यांचे सर्व सहकारी निष्ठेने कार्यरत आहेत.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाला मोठे महत्त्व असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळू शकते. निरवांगी येथे अजिंक्य कांबळे यांनी सुरू केलेला हा उपक्रम इंदापूर तालुक्यातील शेतकरी व युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

