₹१५०० किमतीच्या आरोग्य तपासण्या नागरिकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार
बेलापूर : गौसे आज़म सेवाभावी संस्था, बेलापूर यांच्या वतीने बेलापूर येथील नागरिकांसाठी शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष मोफत संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरासाठी अहिल्यानगर येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. तसेच HOLISTIC CARE NATURAL HEALING यांच्या सहकार्याने नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये महिला व पुरुषांसाठी रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, दातांच्या समस्या, थायरॉईड, हृदयविकार, महिलांचे आजार यांसह विविध शारीरिक समस्यांबाबत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे १५०० रुपये किमतीच्या तपासण्या नागरिकांना पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून QRMA संगणकीकृत मशीनद्वारे एकूण ३९ प्रकारच्या तपासण्यांची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लाइफकेअर मल्टीस्पेशालिटी एवं होलिस्टिक हेल्थ क्लिनिक, जामा मस्जिद, गावकरी पतसंस्थेसमोर, बेलापूर येथे पार पडणार आहे.
बेलापूर व परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गौसे आज़म सेवाभावी संस्था, बेलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

