shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजयराव चौगुले यांना धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा

वडार समाजाची जिल्हा अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे मागणी...



अहमदनगर: प्रतिनिधी( सागर धनवटे ): नवी मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा मी वडार महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष विजयराव चौगुले यांना एक निनावी पत्र पाठवून ५० लाख रूपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे.खंडणी न दिल्यास बदनामी करून जीवे मारण्यात येईल असे सदर पत्रामध्ये नमुद केले आहे.     

या पत्रातील धमकीमुळे राज्यातील समस्त वडार समाजामध्ये कमालीचे असंतोष पसरले आहे.अशावेळी भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.









अशी मागणी अहमदनगर जिल्हा वडार बांधवांच्या वतीने पोलीस अधिक्षक व जिल्हा अधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे.   

  याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी वडार महाराष्ट्र  संघटनेचे अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगर पालिकेचे  विरोधी पक्ष नेते विजयराव चौगुले यांना ५० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी पत्राव्दारे दिली आहे. सदरच्या पत्रामुळे राज्यातील वडार समाज पेटून उठलेला आहे. तरी धमकी देणा-या इसमास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी ..अन्यथा वडार समाज बंधु-भगिनी  रस्ता रोको, रेल रोको,आमरण उपोषण असे उग्र स्वरुपाचे आंदोलन करतील असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.       

या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेलार, संपर्कप्रमुख विजयराव धनवडे,राजु धोत्रे ,आदिनाथ मासाळकर,  सोपान गुंजाळ,किरण तागडकर,किरण वेताळ यांच्या सह्या आहेत.






शिर्डी एक्सप्रेस वर आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@ Gmail.com वर


close