shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी प्राप्त झाला इतक्या कोटींचा निधी


अहमदनगर- महाविकास आघडी सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफीत नगर जिल्ह्यात मंगळवारीअखेर 511 कोटींचा निधी जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आहे. हा निधी येत्या दोन दिवसांत बँकेच्या 85 हजार 579 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.



या शेतकर्‍यांना 2 हजार 296 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणिकरण करण्यात येत आहे.प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या खात्यांची नावे पुढे सरकत असून त्यानूसार बँकेच्या खात्यावर सरकारच्या आयटी विभागाकडून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हा बँकेच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येत आहे.यात सोमवारी 10 हजार 176 शेतकर्‍यांसाठी 69 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम जमा करण्यात आली होती. तर काल मंगळवारी 75 हजार 403 शेतकर्‍यांसाठी 442 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

येत्या दोन दिवसांत संबंधीत कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा केल्यावर त्याला एसएमएसव्दारे कर्जमुक्त झाल्याचे सुचित करण्यात येणार आहे. दुसरीकडे पात्र शेतकर्‍यांच्या आधार प्रामाणिकरणाची प्रक्रिया जोरात असून असून मंगळवार अखेर 1 लाख 75 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण झाले होते.
Www.shirdiexpress.liveवर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा shirdiexpress7273@gmail.comवर 
close