बदलापूर:- अरूण ठोंबरे
बदलापूर आणि वांगनी येथे राहणारे अनेक कलाकार हे रोजंदारीवर चित्रपट महामंडळ सदस्यत्व प्राप्तकरून आपली व आपल्या परिवाराची उपजिविका करतात. गेल्या एक महिन्यापासून लॉक डाऊनमुळे लोकल ट्रेन बंद झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
त्यांची हि करुण कहाणी शिल्पा सावंत आणि प्रियांका साळवी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र चिटणीस कालिदास देशमुख यांना सांगितली. यापूर्वी राष्ट्रवादीतर्फे अनेक ठिकाणी,गरीब गरजू लोकांना, अनाथ मुलामुलीना आणि सर्व थरातील लोकांना मदतीचा हात दिला. आताही अनेकजण त्यांना संपर्क करून मदत मागतात. त्यांचे कार्य हे उल्लेखनीय असून कौतुकास्पद आहे. यावेळी कालिदास देशमुख यांनी हातावर पोट असलेल्या कलाकारांना मदत करून मोठा दिलासा दिला आहे. मदत मिळालेल्या कलावंतांनी मनापासून त्यांचे आभार मानले.