अहमदनगर दि.20 -
जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी माहे मार्च 2020 अखेर कार्यालयामध्ये कार्यरत असणा-या मनुष्यबळाची माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
सर्व सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी माहे जानेवारी 2020 ते मार्च 2020 या तिमाही कालावधीतील कार्यालयातील आस्थापनावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची माहिती विवरण पत्र (ईआर-1) या विभागाच्या https//rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टवर 30 एप्रिल 2020 पूर्वी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. विवरण पत्र विहित मुदतीत ऑनलाईन न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी तसेच विवरणपत्र ऑनलाईन भरताना काही अडचनी असल्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी रोड, अहमदनगर (दुरध्वनी क्र. 0241-2425566) येथे संपर्क साधवा असेही एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.