shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फरासखाना, विश्रामबाग तसेच डेक्कन पोलिस स्टेशन अंकित सर्व पोलिस चौकीमध्ये ‘जलक्रांती’ पुणे व बाराबलुतेदार महासंघतर्फे जॅपनिस पद्धतीचे लिक्वीड सॅनिटायजेशन

पुणे- पुण्यातील फरासखाना, विश्रामबाग तसेच डेक्कन पोलिस स्टेशन अंकित सर्व पोलिस चौकीमध्ये “जलक्रांती” पुणे व बाराबलुतेदार महासंघतर्फे जॅपनिस पद्धतीचे लिक्वीड सॅनिटायजेशन करण्यात आले. 



आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे व  दुःखाचे सावट आहे. प्रथम महाराष्ट्रमध्ये पुणे शहरात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आज खऱ्या अर्थाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, प्रशासन, तसेच पोलिस कर्मचारी अहोरात्र झटत असून त्यांच्याही आरोग्याची काळजी करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून फरासखाना, डेक्कन, विश्रामबाग पोलिस स्टेशन व त्या अंकित पोलिस चौकीत व पोलिसांच्या गाड्या सॅनिटाइज करण्यात आले. फरासखाना पोलिस स्टेशन, विश्रामबाग पोलिस स्टेशन, डेक्कन पोलिस स्टेशन सेनिटाइज करण्यात आली. व ह्या बद्दलची माहीती सर्व कर्मचारी वर्गानां सांगण्यात आली.

यावेळी डेक्कन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस आयुक्त यादव साहेब, विश्रामबाग पोलिस स्टेशनचे पोलिस अधीक्षक लगड साहेब, फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलिस अधीक्षक दादासाहेब चोडाप्पा तसेच पोलिस अधीक्षक कळसकर साहेब पोलीस उपस्थित होते.

सदर सामाजिक उपक्रम “जलक्रांती पुणे” यांचे संस्थापक डॉ. तुकाराम आवळे, डाॅ. संदीप शिवेकर जलक्रांती पुण्याचे अध्यक्ष माणिक टिळेकर व रवी गोंदके, सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत, अमितभाऊ कांबळे, पराग राणे व बाराबलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल अनंतराव जाधव यांनी राबवला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे साहेब व माजी नगरसेवक सतिशदादा दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
close