shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेहरूनगर परिसरातील ५५ वर्षीय महिलेेचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’, शहरातील आजपर्यंतच्या ‘कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ६४ वर..!


 पिंपरी-चिंचवड/पुणे :
पिंपरी चिंचवडमधील कोरोनाच्या रूग्णात आज रोजी एकने वाढ झाली आहे. 




नेहरूनगर परिसरात राहणा-या ५५ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ६४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज शहरातील ७२ संशयित रुग्णांचे घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले आहेत. तर काल तपासणीसाठी पाठवलेले ४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. तर नेहरूनगर परिसरातील एका ५५ महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलायं. त्यामुळे शहरातील सध्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४५ झाली असून त्यापैकी ३७ जणांवर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एक रूग्ण वडगाव शेरी येथील रहिवासी आहे. तर शहरातील ८ जणांवर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान १८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडमधील कोरोना अपडेट्स सायं. ७.३० वाजेपर्यंतचे 

आज दाखल झालेले संशयित रूग्ण = ७२

 आज तपासणीत निगेटिव्ह आलेले रूग्ण = ४४


 सध्या कोरोना बाधित रूग्ण = ४५ (वायसीएम ३७ +८ रूग्णांवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू) कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या = १८(आज १ रूग्ण कोरोना मुक्त)

आज वाढ झालेल्या बाधित रूग्णांची संख्या = ०१

प्रतिक्षेतील अहवाल = ७२

आजपर्यंत मृत रूग्णांची संख्या = ०२

होम क्वारंटाईन नागरिकांची एकूण संख्या  = २,९५४

आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या =  ६४

दैनंदिन सर्व्हेक्षण केलेली लोकसंख्या = ४६,०६६

 STAY HOME  STAY SAFE
 Source – PCMC Health Dept.
close