पुण्यात आतापर्यंत तीन हजारा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. सदाशिव पेठेतील औषधांच्या घाऊक दुकानातील तीन कर्माचाऱयांना बुधवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारपासून तीन दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
पुणे : सदाशिव पेठेतील घाऊक औषधांच्या एकाच दुकानात 33 कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. आतापर्यंत औषधक्षेत्रातील 40 जणांची कोरोना टेस्ट प|झिटीव्ह आली आहे.
पुण्यावर नामुष्की : अॅम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू
पुण्यात आतापर्यंत तीन हजारा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. सदाशिव पेठेतील औषधांच्या घाऊक दुकानातील तीन कर्माचाऱयांना बुधवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारपासून तीन दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. येत्या सोमवारी (ता. 17) ही बाजारपेठ पूर्ववत सुरू होणार असल्याचे केमिस्ट असोसिएशन आँफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे (सीएपीडी) कळविण्यात आले आहे. या दरम्यान, दुकानांचे निर्जंतूकिकरण आणि कर्माचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सदाशिव पेठेतील घाऊक औषधांच्या बाजारपेठेतील एका दुकानातील 33 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याची माहिती पुढे येत आहे. कोरोना चाचणी केलेल्या अजूनही काही कर्मचाऱयांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याचा धोक व्यक्त करण्यात येतो.
सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठेतू औषध घेऊन किरकोळ दुकानादारांपर्यंत ती पोचविण्याचे काम हे कर्मचारी करतात. त्यामुळे या दरम्यान ते कोणा-कोणाला भेटले, त्यांच्या संपर्क कोणाशी आला, याची माहिती घेण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले


